सिंधुदुर्गातील पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्गातील पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.
पत्रकार बांधवांची अनेक दिवसांची इच्छा असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चित वेळेत आणि उत्कृष्ट दर्जासह पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी बोलताना, प्रत्येक प्रकल्पावर वैयक्तिक लक्ष देण्यात येत असल्याचे नमूद करत, आगामी काही वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन पत्रकार बांधवांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा आनंददायी क्षण सर्वजण एकत्र साजरा करू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच आदरणीय नारायण राणे (Narayan Rane )यांच्या कार्याचा उल्लेख करत, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी अनेकांना घरे, रोजगार आणि आयुष्याला नवी दिशा दिल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही त्यांच्या कार्यामुळे लाभलेली माणसे भेटतात, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
राणे साहेबांनी जोडलेली माणसं टिकवणे आणि त्यांचा लोकाभिमुख कारभार पुढे नेणे, हेच कार्य पुढे सुरू असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise), जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत (Pramod Kamat), पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.