Maharashtra: ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा) 

0
27

विजय बने

ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा : निसटत्या आघाडीने तेंडुलकर संघाचे ६ गुण; मान सिंघवीला शतकाची हुलकावणी  

मुंबई, २८ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी लढतीत चांगलीच चुरस आज पाहायला मिळाली. कर्नाटक सपोर्टींग वरील लढतीत तेंडुलकर संघाने गावस्कर संघावर २ धावांची निसटती आघाडी मिळवून पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण मिळवत स्पर्धेतील आपली गुणसंख्या सहा वर नेली आहे.  ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्री संघाच्या २२९ धावांना उत्तर देताना वेंगसरकर संघाने साडेतीनशे पेक्षा अधिक धावा करताना पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवत गुणांचे खाते उघडले आहे. आता ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या शेवटच्या साखळी लढतींपर्यंत गावस्कर आणि  वेंगसरकर संघांचे प्रत्येकी तीन तर तेंडुलकर संघाचे ६ गुण झाले आहेत. रवी शास्त्री संघाचे  शून्य गुण आहेत.  शेवटच्या साखळी लढतीत ओव्हल मैदानात वेंगसरकर संघ विरुद्ध तेंडुलकर संघ तर कर्नाटक सपोर्टींग वर गावस्कर संघ आणि रवी शास्त्री संघ अशा लढती होणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महिला-उद्योजकांनी-सक्/

कर्नाटक सपोर्टींग येथील लढतीत गावस्कर संघाने कालच्या ९ बाद २४९ याच धावसंख्येवर आपला डाव घोषित केल्यानंतर तेंडुलकर संघाच्या पुगाझ सुंदरराज (७१) आणि अरहान पटेल (६३) या जोडीनेदमदार फलंदाजी करताना १३७ धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार हर्ष कदम याने समोरून एक-एक फलंदाज तंबूत परतत असताना दुसऱ्या बाजूने झुंजार फलंदाजी केली.  तालाच्या फलंदाजांच्या साथीने त्याने धावांचा ओघ कायम ठेवला. चहापानाला त्यांच्या ९ बाद २४३ धाव होता  आणि ते सहा धावांनी पिछाडीवर होते. हर्षने चहापानानंतर पहिल्याच षटकांत सहा धाव वसूल  करत संघाला बरोबरी साधून दिली. अकराव्या क्रमांकावरील अजय मोरे याने नंतर शेन रझा याच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत संघाला पहिल्या डावातील महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली आणि  नंतर त्याच षटकात रझा याने त्याचा त्रिफळा उडवत त्यांचा डाव २५१ धावांवर संपविला. शौर्य राणे याने ५२ धावांत ४ तर शेन रझा (५१/२) आणि वेदांग मिश्र (२०/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.

ओव्हल येथील लढतीत वेंगसरकर संघाने आज जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. अरहाम जैन (७३) आणि ईशान पथक (७२) यांनी १५० धावांची सलामी दिली. त्यानंतर आरुष कोल्हे याने पुन्हा एकदा ८२ धावांची खेळी केली तर मान सिंघवी (९९) याला मात्र शतकाने हुलकावणी दिली आणि ४ बाद ३८० याच धावसंख्येवर त्यांनी आपला डाव घोषित केला. त्यांना पहिल्या डावात १५१ धावांची आघाडी मिळाली.

संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान – रवी  शास्त्री संघ – सर्वबाद २२९ आणि   ६.१ षटकांत  ३ बाद ३४ ( आफी शेख १५ धावांत २ बळी )   वि. वेंगसरकर संघ – ४ बाद ३८० डाव घोषित  (अरहाम जैन ७३, ईशान पथक ७२, आरुष कळे ८२, मान सिंघवी ९९, रामप्रसाद विश्वकर्मा नाबाद ३०)

कर्नाटक सपोर्टींग – गावस्कर संघ ९ बाद २४९ डाव घोषित आणि१७ षटकांत २ बाद ३७  वि.. तेंडुलकर संघ – ६६.४ षटकांत सर्वबाद २५१ (पुगाझ  सुंदरराज ७१, अरहाम पटेल ६३, हर्ष  कदम  नाबाद ७३; शौर्य राणे ५२ धावांत ४ बळी, शेन रझा ५१ धावांत २ बळी, वेदांग मिश्रा २० धावांत २ बळी )

                                                          *

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here