एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा 

0
29
एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा 
एच. डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा 

एचडी.एफ.सीबँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा 

  • शास्त्री संघाचा ७४ धावांत खुर्दावेंगसरकर संघाला आघाडी,

  • मंथन शिंदेंचे   बळी

मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या साखळी लढतीत आज कर्नाटक सपोर्टींग (क्रॉस मैदान) वरील लढतीत वेंगसरकर संघाने शास्त्री संघाचा ७४ धावांतच खुर्दा उडवला आणि पहिल्या दिवसाअखेर त्यांच्यावर आघाडी घेण्यात यश मिळविले आहे. ओव्हल मैदानावरील दुसऱ्या लढतीत तेंडुलकर संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २५२ धावांचे लक्ष्य उभारले ; तर प्रतिस्पर्धी गावस्कर संघाचा लेगस्पिनर मंथन शिंदे याने ७३ धावांत ५ बळी मिळविण्याचा पराक्रम केला.
कर्नाटक सपोर्टींगवर वेंगसरकर संघाने नाणेफेक जिंकून शास्त्री संघाला प्रथम फलंदाजी दिली आणि डावखुरा फिरकी गोलंदाज देवेन  शर्मा (२९ धावांत ४ बळी) आणि लेग स्पिनर नयन साळुंखे २ धावांत ४ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीसमोर शास्त्री संघाचा डाव ७४ धावांतच गडगडला. दिव्यम  लोढा याने ४ धावांत २ बळी मिळवत त्यांना मोलाची साथ दिली. शास्त्री संघाच्या अक्षद जोशी (१८), श्रेयस लाटे (१६), कियान प्रजापती (११) आणि रणवीर सिंग (११) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या.  या आव्हानाचा पाठलाग करताना वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाअखेर ४ बाद १०६ धावांची मजल मारत ३२ धावांची आघाडी मिळविली आहे.  समर्थ महाडिक (खेळात आहे ३९) याने अर्शियन शेख (२९) याच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची तर अंकित म्हात्रे (२०) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचत आघाडी घेण्यात मोलाचा वाटा उचलला.  शास्त्री संघाचा मध्यमगती गोलंदाज असद खान याने २७ धावांत २ बळी मिळविले.
ओव्हल मैदानावर लढतीत तेंडुलकर संघाने केवळ ४ धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर सावधपणे फलंदाजी केली. नील नाईक आणि नीरज सिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागी रचली. नीलने २०३ चेंडूत ११ चौकारांसह ८८ तर नीरज सिंग याने ५० धावा केल्या. नीलने नंतर रितेश  गुप्ता  याच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी आणखी ६० धावांची भर टाकली. नीयांश मारू याने ३७ धावांची भर टाकली.  गावस्कर संघाचा लेगस्पिनर मंथन सिंग याने ७३ धावांत ५ बळी तर ऑफ स्पिनर लॅव्हिश सिंग याने २७ धावांत २ बळी मिळविले.  पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गावस्कर संघाने ८ धावांत १ विकेट गमावली असून ते अजून २४४  धावांनी  पिछाडीवर आहेत.
संक्षिप्त धावफलक –  कर्नाटक सपोर्टींग – क्रॉस मैदान –  शास्त्री संघ ३४.४ षटकांत सर्वबाद ७४ (श्रेयस  लाटे १६, अक्षद जोशी १८; देवेन  शर्मा २९ धावांत ४ बळी, दिव्यम लोढा ४ धावांत २ बळी, नयन साळुंखे २ धावांत ४ बळी) वि. वेंगसरकर संघ – ३६ षटकांत ४ बाद १०६ (अर्शियन शेख २९, समर्थ महाडिक खेळत आहे ३९, अंकित म्हात्रे २०; असद खान २७ धावांत २ बळी).
ओव्हल मैदान – तेंडुलकर संघ ८३.३ षटकांत सर्वबाद २५२ (नील नाईक ८८, नीरज सिंग ५०, रितेश गुप्ता २८, नीयांश मारू ३७, अमर बीके १४; मंथन शिंदे ७३ धावांत ५ बळी, लॅव्हिश सिंग २७ धावांत २ बळी)  वि. गावस्कर संघ – २.०० षटकांत १ बाद ८ धावा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here