वांद्रे परिसरातील रेल्वे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम रेल्वेची कारवाई

0
23
चेक बाऊन्स प्रकरणांच्या तडजोडीने निपटाऱ्यासाठी १८ जुलै रोजी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग विशेष लोक अदालतीचे आयोजन

मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार पश्चिम रेल्वे प्रशासनाने वांद्रे स्थानकाजवळील रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. ही कारवाई पुढील चार दिवस सुरू राहणार असून मोठ्या प्रमाणावर प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या अतिक्रमणांमुळे रेल्वेच्या दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत होते. तसेच भविष्यातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आणि रेल्वे विकास कामांसाठी जागा उपलब्ध होणे आवश्यक असल्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
या कारवाईमुळे रेल्वे मार्ग अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून प्रवाशांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशासनाने संबंधित नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here