कर्तव्य बजावताना वनरक्षक गोरख बागुल यांचा दुर्दैवी मृत्यू; वनविभागावर शोककळा

0
33

गोरख देवराम बागुल या इगतपुरी वनपरिक्षेत्रातील अडसरे बीटमध्ये कार्यरत असलेल्या निष्ठावंत वनरक्षकांचा शासकीय कर्तव्य बजावताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे वनविभागासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर लाकूड वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय प्रक्रियेसाठी ते तातडीने निघाले होते. यावेळी नाशिक–मुंबई महामार्गावर भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
गोरख बागुल यांनी वनरक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत असतानाच भारतीय सैन्यातही दीर्घकाळ देशसेवा केली होती. कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते.
त्यांच्या निधनाने वनविभागाने एक धाडसी आणि समर्पित अधिकारी गमावला असून त्यांच्या शौर्य आणि निष्ठेचा अभिमान कायम राहील, अशा भावना व्यक्त होत आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here