‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’ परिषदेत महत्त्वाचा सामंजस्य करार; ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रशिक्षण मिळणार

0
21

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक महाइम्पॅक्ट २०२६’ परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराअंतर्गत राज्यातील टियर-२, टियर-३ तसेच वंचित भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान विषयक जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.
या उपक्रमाद्वारे उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि तंत्रज्ञानाधारित क्षमता वृद्धी घडवून आणणे यासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस. तसेच महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here