‘जनगणना २०२७’चा पहिला टप्पा सुरू; १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची नोंदणी

0
28
‘जनगणना २०२७’चा पहिला टप्पा सुरू; १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची नोंदणी
‘जनगणना २०२७’चा पहिला टप्पा सुरू; १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची नोंदणी

‘जनगणना २०२७’चा पहिला टप्पा सुरू; १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची नोंदणी

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत देशभरात घरांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक ‘प्रगती’ आणि ‘विकास’ नागरिकांच्या घरी भेट देऊन विविध माहिती संकलित करणार आहेत.
या जनगणना प्रक्रियेत घराचा प्रकार, कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, इंटरनेट सुविधा, वापरातील इंधन, घरातील खोल्यांची संख्या, मालकी हक्क, आर्थिक स्थिती यांसह विविध सामाजिक आणि मूलभूत सुविधांबाबत माहिती विचारली जाणार आहे.
प्रगणक नागरिकांकडून अचूक माहिती संकलित करण्यासाठी अधिकृत ओळखपत्रासह भेट देणार आहेत. शासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून चुकीची किंवा अपूर्ण माहिती न देण्याचे सांगण्यात आले आहे.
जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, ग्रामविकास आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनगणनेतील आकडेवारीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

प्रगणकांकडून विचारले जाणारे संभाव्य प्रश्न :

  • घराचे स्वरूप – कच्चे / पक्के
  • घर मालकीचे की भाड्याचे?
  • कुटुंबातील सदस्यांची संख्या
  • प्रत्येक सदस्याचे नाव, वय आणि लिंग
  • शैक्षणिक पात्रता
  • व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन
  • मोबाईल / इंटरनेट सुविधा
  • पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह सुविधा
  • स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन
  • घरातील खोल्यांची संख्या
  • वाहन किंवा इतर सुविधा
नागरिकांनी जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here