अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण सक्तीचे; १५ ऑगस्टपर्यंत मुदत

0
66
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण सक्तीचे; १५ ऑगस्टपर्यंत मुदत
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण सक्तीचे; १५ ऑगस्टपर्यंत मुदत

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण सक्तीचे; १५ ऑगस्टपर्यंत मुदत

मुंबई : राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी आणि मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अमराठी चालकांनी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये मराठी भाषेचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असून १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण केंद्रे उभारण्यासाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्यामार्फत संयुक्तपणे उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची व्यावहारिक मराठी भाषेवरील क्षमता तपासण्यासाठी तोंडी परीक्षाही घेतली जाणार आहे.
या मोहिमेसाठी सुमारे चार हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी विनामूल्य उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मराठी भाषा आत्मसात करावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here