दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने दापोली तालुक्यातील पालगड शिक्षण प्रभागात नवनियुक्त झालेल्या सर्व शिक्षण सेवक शिक्षकांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. दापोली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्वागत समारंभासाठीच्या व्यासपीठावर शिक्षक संघाचे माजी तालुकाध्यक्ष जीवन सुर्वे, तालुका नेते अविनाश मोरे, तालुका सचिव गणेश तांबिटकर, कोषाध्यक्ष महेंद्र खांबल, कार्याध्यक्ष सुदेश पालशेतकर, तालुका संघटक महेश गिम्हवणेकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबू घाडीगांवकर, महाराष्ट्र जुनी पेंशन संघटनेचे तालुका सचिव राहुल राठोड, तालुका महिला आघाडी प्रमुख अश्विनी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-गणपतीपुळे-तीर्थक्षेत्र/
नवीन शिक्षक भरती अंतर्गत दापोली तालुक्यात नवनियुक्त शिक्षण सेवक नुकतेच हजर झाले आहेत. पालगड प्रभागात नवनियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांचे स्वागत करण्यासाठी, त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी दापोली तालुका शिक्षक संघाच्या वतीने पालगड प्रभागातील नवनियुक्त शिक्षण सेवकांसाठी विशेष स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य सानेगुरुजी विद्यालयाच्या कलामंदिरात पार पडलेल्या या समारंभात सर्व नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सर्व नवनियुक्त शिक्षकांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभा राहणार असल्याचे सांगितले. यावेळी काही नवनियुक्त शिक्षण सेवकांनीही मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीषकुमार थोरात व महेश कासार यांनी केले तर तालुका सचिव गणेश तांबि