Maharashtra: धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील शेतकरी आणि शेतकऱ्याचे दोघे बैल विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी

0
39
विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी ,
कापडणे येथील शेतकरी आणि शेतकऱ्याचे दोघे बैल विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी

धुळे – धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील शेतकरी आणि शेतकऱ्याचे दोघे बैल विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले, मन सुन्न करणारी घटना घडली अवघ्या ४० वर्षाच्या वयात केवळ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला, लालू भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली! . https://sindhudurgsamachar.in/kokan-ओल्या-काजूगरासाठी-वें/

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीच्या अथवा बोरवेलच्या विद्युत पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक वायर, स्टाटर लावलेले असतात तिथे वायर कट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होवुन आजूबाजूच्या परिसरात करंट उतरलेले असते, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोटरच्या पेटी जवळ जाताना काळजी घ्यावी जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही.प्रत्येक गावातील ग्रुप वर मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून शेतकरी सावधान होतील, आणि अशी दुर्दैवी घटना घडणार नाही. सध्या दिवसाची लाईट आहे काही विद्युत तार हे जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर आहेत त्यांची ही काळजी घ्या, लोखंडी पोलांचीही काळजी घ्या, कामाचा लोड भरपूर आहे पण जीवही तितकाच महत्त्वाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here