शिर्डीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

0
26

शिर्डी : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या संरक्षण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शिर्डी दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या भेटीदरम्यान त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन देशाच्या प्रगती, सुरक्षा आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here