भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
२००२ तसेच २०२४-२५ च्या मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत लिंकचा वापर करावा. नाव तपासल्यानंतर संबंधित BLO (Booth Level Officer – मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याकडे आवश्यक माहिती देऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
मतदार यादीतील माहिती अचूक आणि अद्ययावत राहण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपला मतदानाचा अधिकार सुरक्षित करावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.