दापोडेच्या अभिजीत पाटील यांची पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये घवघवीत यश; IPS पदासाठी निवड

0
52

भिवंडी | प्रतिनिधी
भिवंडी तालुक्यातील दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत पाटील यांनी अवघ्या २२ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) पदासाठी निवड मिळवली आहे.
अभिजीत यांनी UPSC परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ४७० वी रँक प्राप्त केली असून त्यांची राजस्थान कॅडरमध्ये IPS अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे दापोडे गाव, भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा तसेच संपूर्ण आगरी समाजाचा अभिमान उंचावला आहे.
अभिजीत यांच्या यशामागे अथक परिश्रम, जिद्द, नियोजनबद्ध अभ्यास आणि स्पष्ट ध्येय यांची मोठी भूमिका आहे. पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या यशामुळे “वय नव्हे तर मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटी महत्त्वाची असते” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. अभिजीत यांनी आपल्या समर्पित प्रयत्नांनी दाखवून दिले की योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते.
त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. भरभराटीचे आणि यशस्वी भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा.त्यांच्या कहाणीने अनेक युवकांना स्वप्ने पाहण्यास आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यास नक्कीच प्रेरित करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here