Kokan: मारहाण प्रकरणातील संशयीतांची निर्दोष मुक्तता

0
30
देवगड विनयभंग प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर; मुख्य आरोपी गितेला अद्याप जामीन नाही
देवगड विनयभंग प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर; मुख्य आरोपी गितेला अद्याप जामीन नाही


वेंगुर्ला प्रतिनिधी
– मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी रामकृष्ण द्वारकानाथ कुर्लेसह अन्य सहा जणांची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयीत आरोपींच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विशाळगड-मुक्ती-संदर्भा/

उभादांडा-कुर्लेवाडी येथील फिर्यादी विलास विष्णू कुर्ले याने आपण 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी कामगाराला घेऊन आपल्या बागेतील आंबा कलम व माड यांना खत घालत असताना संशयीत आरोपी विजया रामकृष्ण कुर्ले व रामकृष्ण द्वारकानाथ कुर्ले हे तेथे आले आणि शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली व मोठमोठ¬ाने आरडाओरड करू लागले. ते ऐकुन त्यांचा मुलगा संशयीत आरोपी योगेश्वर रामकृष्ण कुर्ले हा हातात लोखंडी पारय घेऊन व त्यानेही जीवे मारण्याची धमकी देऊन आपल्या हातावर लोखंडी पारय मारून दुखापत केली. त्यावेळी हेमकांत रामकृष्ण कुर्ले व हेमांगी हेमकांत कुर्ले यांनीही शिविगाळ करत लाकडी दांड¬ाने मारहाण केली असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार वेंगुर्ला पोलिसांत संशयीत आरोपी रामकृष्ण द्वारकानाथ कुर्ले, विजया रामकृष्ण कुर्ले, योगेश्वर रामकृष्ण कुर्ले, हेमकांत रामकृष्ण कुर्ले, हेमांगी हेमकांत कुर्ले, दिपक रामकृष्ण कुर्ले यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती.

मात्र, या प्रकरणी संबंधित गुन्ह्रातील साक्षीदार व साक्षी पुरावे तपासून व संशयीत आरोपीच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर यांनी आरोपीची मांडलेली बाजू योग्य मानून व आरोपीच्यावतीने केलेला युक्तीवाद ग्राह्र मानून संशयीत आरोपी विरूद्ध गुन्हा शाबीत होत नसल्याच्या कारणाने सबळ पुराव्या अभावी सर्व संशयीत आरोपींची 29 जून रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here