⭐वेंगुर्ल्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असताना येथील लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प
– ⭐वेंगुर्ले दीपगृह परिसरात पकअमलीपदार्थ विरोची सप्ताहातच वेंगुर्ले शहरात सुरू असलेला अमलीपदार्थ व्यवहार कस्टम विभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उजेडात आला डण्यात आलेल्या गांजा मागील सूत्रधार कोण ?
वेंगुर्ले – वेंगुर्ले शहरातील लाईट हाऊस निमुसगा परिसरात कस्टम विभागाने कारवाई करून 500 ग्रॅम गांजा जप्त केला आहे या कारवाई नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून वेंगुर्ल्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असताना येथील लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-महालक्ष्मी-कंपनीची-वीज-थ/
वेंगुर्ले कस्टम विभागाला 28 जून रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारात वेंगुर्ले निमुसगा येथून दीपगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सुनसान ठिकाणी तीन युवक थांबले असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या परिसरात जाऊन त्या ठिकाणी थांबलेल्या युवकांची पाठलाग केला असता ते युवक त्या ठिकाणाहून पसार झाले असल्याचे सांगण्यात येते मात्र त्या ठिकाणी कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांना पळून जाणाऱ्या युवकाच्या हातातील पिशवी मात्र तेथे पडली ही पिशवी आहे त्या स्थितीत जप्त करून कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्याऱ्यांनी पळून जाणाऱ्या युवकांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोठेच आढळून न आल्याने अखेर त्यांनी जप्त केलेली पिशवी कस्टम विभागाच्या कार्यालयात आणली. तेथे ही पिशवी खोलून पाहिली असता, खाकी रंगाच्या चिकटपट्टीने बंदिस्त केलेले मऊ व फुगीर पाकिट आढळून आले. या पाकिटात गांजासदृष्य पदार्थ असावा असा अंदाज करून येथील कस्टम विभागाच्या कार्यालयाने वरिष्ट अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेलाही याची माहिती देण्यात आली होती. मात्र, वेंगुर्ले पोलीस स्टेशनला याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. केलेली कारवाई गुप्त ठेवून कस्टम विभागाने स्वतंत्ररित्या या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपींचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला गेला. जप्त केलेला पदार्थ हा गांजाच असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी दुपारनंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी वेंगुर्त्याच्या प्रथम दिवाणी न्यायालयात हे प्रकरण दाखल केले.
ऐन अमलीपदार्थ विरोची सप्ताहातच वेंगुर्ले शहरात सुरू असलेला अमलीपदार्थ व्यवहार कस्टम विभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उजेडात आला असला तरी या अमली पदार्थ तस्करी मागील मुख्य सूत्रधार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेंगुर्ले येथे झालेल्या या कारवाईवरून वेंगुर्ले निमुसगा येथून दीपगृहाकाडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हा व्यवहार चालत असल्याचा संशय सर्वांकडून व्यक्त केला जात आहे.या कारवाई बाबत कस्टम विभागाकडून गुप्तता पाळली गेल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. २८ जून ला केलेल्या कारवाईचे प्रकरण कोर्टात दाखल होण्यासाठी ३ जुलै पर्यंत का थांबावे लागले असाही प्रश्न उपस्थित होत आहे निमुसगा येथे भर दुपारी केलेल्या कारवाईतून निसटलेल्या युवकांकडे दुचाकी अथवा अन्य वाहने का आढळून आली नाहीत ? पळणाऱ्या युवकांच मोबाईल शूटिंग का करण्यात आला नाही व मोजक्याच कर्मचाऱ्यांकडून कारवाई का करण्यात आली अनियंत्रणेचा वापर का करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लाईट हाऊस परिसरामध्ये पोलिसांकडून ग्रस्त घातली जात असताना देखील अशा प्रकारची अमली पदार्थांची तस्करी या ठिकाणाहून होत असेल तर ही बाब पोलिसांच्या का निदर्शनास आली नाही ?सावंतवाडी मतदारसंघात इतर ठिकाणी होत असलेला अमली पदार्थांचा सुळसुळाट थेट किनारपट्टी भागातील वेंगुर्ले शहरापर्यंत पोचला असून शहरातीलच नव्हे तर गावातील तरुणाई देखील अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असून यामागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे.
येथील तरुणाई बरबाद होत असताना देखील येथील लोकप्रतिनिधी या प्रकरणांकडे गांभीर्याने का बघत नाहीत अनेक लोकांचे संसार उध्वस्त होत असताना देखील वेगवेगळ्या कमिट्यांची व पक्षांची पदे घेऊन मिरवणारे सर्वजण अशा प्रकरणांकडे डोळेझाक का करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या प्रकरणांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.