प्रतिनिधी – पांडुशेठ साटम
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शिरगाव मध्ये वडाचे झाड पडून वाहतूक ठप्प झाली देवगड निपाणी रोडही बंद झाला आहे. कुडाळ,पावशी येथील लिंगेश्वर मंदिर मध्येही पाणी आले आहे. अनेक ठिकाणी पाणी वाढल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अतिवृष्टीमुळे ठीक ठिकाणी पुरस्थिती उद्भवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे लोकांची जेवण व राहण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोंगळे-शाळेत-शैक्षणिक-सा/
कोकणात कुडाळ जवळील वाहतूक सुरु असलेल्या जुन्या पुलाला भगदाड पडले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही न केल्याने तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. वैभव नाईक यांनी फैलावर घेतले.