एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. १ जून : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेडी, गावे आणि शहरांना जोडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘लाल परी’ काळानुसार झपाट्याने बदलत असून आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एसटी आजही विश्वासार्ह वाहतूक सेवा म्हणून कार्यरत आहे.
७८ व्या वर्धापन दिनानिमित्त एसटीला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख बनविण्यासाठी नव्या संकल्पांची घोषणा करण्यात येणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.


