Kokan: मुसळधार पावसामुळे पाट- तेलीवाडी येधील रामचंद्र उर्फ बाळू तेली यांचे मातीचे घर कोसळून भुईसपाट झालेची वार्ता कळताच खा.निलेश राणे यांची त्या कुटूंबाला भरीव आर्थिक मदत

0
26
आर्थिक मदत
पाट- तेलीवाडी येधील रामचंद्र उर्फ बाळू तेली यांचे मातीचे घर कोसळून भुईसपाट

कुडाळ/मनोज देसाईता. ०९-:

मुसळधार पावसामुळे पाट- तेलीवाडी येधील रामचंद्र उर्फ बाळू तेली यांचे मातीचे घर कोसळून भुईसपाट झाले. याबाबतची माहिती पाटचे माजी सरपंच समाधान परब यांनी तत्काळ कळविली असता माजी खासदार निलेश राणे यांनी भरीव आर्थिक मदत करून घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रीय-ग्रामीण-विकास/

जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे रामचंद्र उर्फ बाळू तेली यांचे घर पूर्ण कोसळले असल्याने निलेश राणे यांच्या सुचनेनुसार कुडाळ मंडल भाजपा अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज सायंकाळी घटनास्थळी जावून भेट दिली. तसेच निलेश राणे यांनी दिलेली आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच घरकुल योजनेअंतर्गत घर मंजूर करून देण्यात येईल. तसेच योजनेच्या माध्यमातून विलंब होत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घरबांधकाम करून देण्यात येईल असा शब्द संजय वेंगुर्लेकर यांनी दिला.

यावेळी माजी सरपंच समाधान परब, उपसरपंच समिर धुरी, पंढरीनाथ तेली, गुंडू खोर्जुवेकर, शरद धुरी, मंगेश कोळंबकर, दिलीप पाटकर, गणपत तेली, अक्षय तेली तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here