Kokan: आचरा परिसरात सोमवारी रात्री ढगफूटीसदृश्य स्थिती शिवापूर बंधारा गेला वाहून अनेकांच्या घरात घुसले पाणी

0
36
ढगफूटी,
आचरा परिसरात ढगफूटीसदृश्य पावसाने शिवापूर बंधारा वाहून गेला,अनेकांच्या घरात घुसले पाणी

मालवण:/शशांक कुमठेकर

सोमवारी रात्री ढगफूटीसदृश्य कोसळणारया मुसळधार पावसामुळे आचरा परीसराला चांगलेच झोडपले. आचरा -गाऊडवाडी, हिर्लेवाडी, चिंदर, सडेवाडी परिसर जलमय झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने काहींना स्थलांतरित व्हावे लागले. हिर्लेवाडी गाऊडवाडी परिसरात सकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. पाण्याचा वेग एवढा होता की, शिवापूर बंधाऱ्याला याचा फटका बसून मधला भाग वाहून गेल्याने दोन भाग झाले आहेत. आचरे ,चिंदर- सडेवाडी भागात सोमवारी सायंकाळी सुरु झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे गाऊडवाडी भागात ग्रामपंचायत परीसर पुर्णतः जलमय बनला होता. हिर्लेवाडी भागालाही याचा फटका बसला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भाईंदर-रेल्वे-स्थानकात/

सायंकाळी साडेसात पासून पाणी वाढू लागल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली गेले होते. रात्री पाण्याचा वेग वाढत होता. रस्त्यावर चार फुटाच्या वर पाणी वाढले होते. हिर्लेवाडी येथील शिवापूर बंधारयाही याचा फटका बसला. या परिसरात तौक्ते वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आचरा गाऊडवाडी येथील सायमंड फर्नाडीस, जाकारीयस फर्नाडीस (गुरुजी) , बेन्तु फर्नाडीस , सिल्वेस्टर फर्नाडीस, पीटर फर्नाडीस ,साल्वादर मिरीन्डा लँन्सी फर्नाडीस आदींसह सर्व ख्रिश्चनवाडीतील घरात पाणी घुसल्याने येथील काहींनी लगतच्या स्लॅबच्या घराचा आसरा घेतला होता. तर काहींना काझीवाडा वाचनालयात हलविण्यात आले होते. गाऊडवाडी येथील माजी उपसरपंच अनिल करंजे ,ग्रामपंचायत कार्यालय आचराच्या दरवाजापर्यत रात्री पाणी आले होते. आचरा हिर्लेवाडी येथे पुरुषोत्तम पेडणेकर गोरखनाथ पेडणेकर अश्विन हळदणकर राजू पेडणेकर याच्या घरात पाणी गेले होते. हिर्लेवाडी त्यामुळे घरातील सामान अन्न धान्य भिजून नुकसान झाले आहे. ब्राम्हणदेव मंदिर परिसर देखील जलमय झाला होता.

मुसळधार पावसाने चिंदर सडेवाडी परीसराला ही फटका बसला. येथील बच्चू सद्गुरु यांच्या गाड्यामध्येही पाणी घुसल्याने गाड्यांचे नुकसान झाले आहे. तरसुधीर मसुरकर,मोहन गोलतकर,उल्हास,वनिता वराडकर यांच्या घरात पाणी घुसले होते. यात मसुरकर व्यतिरिक्त अन्य घरे बंद असल्याचे समजते. याबाबत मंगळवारी मंडल अधिकारी अजय परब,तलाठी संतोष जाधव, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here