पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती; महापौर रितू तावडे यांची चेंबूरमध्ये पाहणी

0
41

मुंबई — आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालेसफाईच्या कामांना वेग देण्यात आला असून मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी चेंबूर येथील आर. सी. मार्ग परिसरातील अयोध्या नगर लगत सुरू असलेल्या नाल्यातील गाळ उपसा कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

मानसिंह विजय सोसायटीजवळ सुरू असलेल्या या कामांचा महापौरांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामे निर्धारित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी नाल्यातील साचलेला गाळ वेळेवर काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले. नालेसफाईची कामे प्रभावीपणे झाल्यास जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महानगरपालिकेकडून जलनिस्सारण व्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात येत असून सर्व आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here