मुंबई — मत्स्यव्यवसाय व जलशेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंघटित कामगारांना केंद्र शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘ई-श्रम कार्ड’ उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
मत्स्यव्यवसाय, जलशेती, मासे प्रक्रिया, वाहतूक आणि संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून या योजनांचा लाभ मिळवू शकतात. नोंदणीकृत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार होत असल्याने भविष्यात शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणे अधिक सुलभ होणार आहे.
ई-श्रम कार्डासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी इच्छुकांनी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी: