महागाई आणि बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा नवी मुंबईत एल्गार

0
43
हागाई आणि बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा नवी मुंबईत एल्गार
हागाई आणि बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा नवी मुंबईत एल्गार

महागाई आणि बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा नवी मुंबईत एल्गार

सरकारला दिला इशारा

नवी मुंबई — सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य करणाऱ्या वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने नवी मुंबई येथे जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात एल्गार पुकारला.

आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक चूल पेटवून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली आर्थिक कोंडी अधोरेखित करण्यात आली. तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा इशारा असल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, खासदार बाळासाहेब (बाळ्या मामा) पाटील, आमदार जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवती आघाडीच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी महागाई, बेरोजगारी, वाढते इंधन दर आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार या मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर महागाईचे गंभीर परिणाम होत असून शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेची सहनशीलता संपत चालली असून सरकारने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने दखल घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here