रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणूक : जुईली महेंद्र दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला

0
43

रत्नागिरी — महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडली असून अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

या मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जुईली महेंद्र दळवी यांनी ३० मे रोजी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी दळवी यांचा उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतला.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणूक प्रशासनाकडून पुढील निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here