सिंधुदुर्गनगरी येथे १९ जून रोजी ‘डाक अदालत’

0
41
सिंधुदुर्गनगरी येथे १९ जून रोजी ‘डाक अदालत’; पोस्ट सेवांबाबतच्या तक्रारींसाठी नागरिकांना संधी
सिंधुदुर्गनगरी येथे १९ जून रोजी ‘डाक अदालत’; पोस्ट सेवांबाबतच्या तक्रारींसाठी नागरिकांना संधी

सिंधुदुर्गनगरी येथे १९ जून रोजी ‘डाक अदालत’

पोस्ट सेवांबाबतच्या तक्रारींसाठी नागरिकांना संधी

सिंधुदुर्गनगरी — पोस्ट सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारींचा जलद आणि प्रभावी निपटारा करण्यासाठी सिंधुदुर्ग पोस्ट विभागातर्फे दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी येथे ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर एन. टी. कुरळपकर यांनी दिली.
भारतीय टपाल सेवा ही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असून नागरिकांना दर्जेदार सेवा देणे आणि ग्राहकांचे समाधान राखणे हे पोस्ट विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, सेवा देताना काही वेळा पत्रव्यवहार, टपाल वितरण किंवा अन्य सेवांमध्ये त्रुटी निर्माण होऊन तक्रारी उद्भवतात. अशा तक्रारींचे योग्य निवारण करण्यासाठी पोस्ट विभागाकडून वेळोवेळी डाक अदालत आयोजित केली जाते.
या डाक अदालतमध्ये पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबाबतच्या अशा तक्रारींची दखल घेतली जाईल, ज्यांचे निवारण संबंधित कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही किंवा तक्रारदाराला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
या विषयांवरील तक्रारींचा विचार केला जाणार :
  • टपाल सेवा
  • स्पीड पोस्ट सेवा
  • काऊंटर सेवा
  • डाक वस्तू व पार्सल
  • बचत बँक सेवा
  • मनीऑर्डर सेवा
तक्रारीमध्ये संबंधित घटनेची तारीख, तक्रार पाठविलेल्या अधिकाऱ्याचे नाव व पदनाम तसेच इतर आवश्यक तपशील नमूद करणे बंधनकारक आहे.
नागरिकांनी आपल्या तक्रारी अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, एन. टी. कुरळपकर यांच्या नावे दि. १७ जून २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा डाक अदालतमध्ये विचार केला जाणार नसल्याचे पोस्ट विभागाने स्पष्ट केले आहे.
पोस्ट सेवांशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग पोस्ट विभागाने केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here