मुंबई-विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले असून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे मत फुटल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल महायुतीमधील पक्षांचा उत्साह वाढवणारा आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-तहसील-कार्यालयात-जाते-अस/
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमके कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
विजयी उमेदवारांची यादी
भाजप – योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना शिंदे गट – भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी अजित पवार गट – राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस – प्रज्ञा सातव
शिवसेना ठाकरे गट – मिलिंद नार्वेकर