रत्नागिरी- खेड स्टेशन ते दिवाण खवटीदरम्यान रेल्वे ट्रॅक वर दरड आल्यामुळे रेल्वे वाहतूक विलंबाने सुरू असल्याने सायंकाळी पाच वाजल्यापासून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उभे असलेल्या तेजस एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांमध्ये प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय आहे किंवा कसे याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत स्वतः रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले, त्यांनी दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-समाचारच्या-स/