Kokan: संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये “करिअर कट्टा ” या उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना

0
20
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये "करिअर कट्टा " या उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना

कुडाळ- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दिनांक १५ जुलै, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये “करिअर कट्टा ” या उपक्रमांतर्गत करिअर संसदेची स्थापना करण्यात आली.युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रप आवश्यक आहेत ते सर्व उपक्रम राबविण्याचे योजले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेरली-गावचा-सुपुत्र-सुरे/

निर्व्यसनी, कर्तृत्वसंपन्न भविष्याचा वेध घेण्याकरीता योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकापर्यंत पोहोचवण्यासाठी महाविद्यालयात स्थापन झालेले करिअर संसद सज्ज झाले आहे.

या वेळी नवीन संसद मधील विविध मंत्र्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला. यावेळी पुढील मंत्र्यांनी शपथ घेतली. –

मुख्यमंत्री – प्रविण सावंत, नियोजन मंत्री तन्वी आजगांवकर, कायदे व शिस्त पालन मंत्री प्राजक्ता थोरात, सामान्य प्रशासन मंत्री- वेदिका लळीत, माहिती व प्रसारण मंत्री-साक्षी चव्हाण, उद्योजकता विकास मंत्री – फैयाज तालिकोट, रोजगार स्वयंरोजगार मंत्री सृष्टी गवळी, कौशल्य विकास मंत्री रसिका गवस, संसदीय कामकाज मंत्री- वासुदेव सावंत, सदस्य शुभम राय

शपथ विधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री श्री प्रविण सावंत यांनी मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए.एन. लोखंडे यांनी मंत्रिमंडळाला संबोधित करताना करिअर कट्टाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. एस. एस. लोखंडे व सदस्य डॉ. रवीद्र ठाकूर, डॉ. एस. के पवार, सौ. एस.जे. निकम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार डॉ. रवींद्र ठाकुर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अजित कानशिडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here