Kokan: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाचा पदग्रहण सोहळा उद्या सायकांळी 7 वाजता होणार संपन्न.

0
25
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ ,
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाचा पदग्रहण सोहळा उद्या सायकांळी 7 वाजता होणार संपन्न.

सावंतवाडी- सुनिता भाईप

बांदा येथे 6 डिसेंबर 2022 रोजी स्थापन करण्यात आलेला रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा गेली दीड वर्ष आपल्या अध्यक्षतेखाली विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत आहे. रोटरीच्या नियमानुसार सर्व पदाधिकारी एका वर्षासाठी असून दरवर्षी 1 जुलै रोजी पदाधिकारी निवडावे लागतात यानुसार यावर्षी अवधूत चिंदरकर यांची अध्यक्ष टम्हणून निवड करण्यात आलेली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शासनाच्या-जाचक-अटीतून-मह/

नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता आनंदी मंगल कार्यालयात पार पडेल अशी माहीत मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिली.सचिव पदी
मिताली सावंत सह सचिव पदी ईश्वरी कल्याणकर व खजिनदार पदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी संकेत वेंगुर्लेकर, अजिंक्य पावसकर, अक्षय कोकाटे, अमित धोंगडे, दत्तराज चिंदरकर, ओंकार पावसकर, निहाल गवंडे, रोहन कुबडे, शंकर कोकाटे, कल्याणदास धुरी, अक्षय गवस, विनिता कुबडे, रुपाली देसाई आदी उपस्थित होते.

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा ने गेल्या दीड वर्षात रोटरी क्लब ऑफ बांदा च्या सहकार्याने 50 पेक्षा जास्त समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रात काम केले आहे. भविष्यात सुद्धा नवीन अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली जोमाने काम करून विविध उपक्रम राबविण्यात येतील असे यावेळी मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here