५,००० हून अधिक फेसबुक मित्रांचा टप्पा; साऊथ मुंबई पत्रकार संघाकडून सर्वांचे आभार
५,००० हून अधिक फेसबुक मित्रांचा टप्पा; साऊथ मुंबई पत्रकार संघाकडून सर्वांचे आभार
मुंबई – साऊथ मुंबई पत्रकार संघच्या वतीने फेसबुक पेजला ५,००० हून अधिक मित्रांचा टप्पा गाठल्याबद्दल सर्व सदस्य, वाचक, हितचिंतक आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता, सामाजिक घडामोडी, जनहिताचे प्रश्न आणि विविध उपक्रमांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना मिळालेला हा प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.
यापुढेही सत्य, निष्पक्ष आणि जनहिताची पत्रकारिता करण्यासाठी तसेच समाजोपयोगी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.