⭐केंद्र सरकारने सुरू केले विशेष पोर्ट
ड्रग्ज व्यापाराविरोधात कोणतीही माहिती टोल फ्री क्रमांक १९३३ वर देता येऊ शकेल. तो २४ तास काम करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी राष्ट्रीय नारकोटिक्स हेल्पलाइन ‘मानस’ची सुरुवात केली. मानस म्हणजे ‘मादक पदार्थ विरोधी माहिती केंद्र’ याअंतर्गत वेब पोर्टल व मोबाइल अॅप सुरू केले आहे. यावर कोणत्याही मादक पदार्थाशी संबंधित गुन्ह्याची माहिती देता येईल व पुनर्वसन-सल्ल्यासाठी मदत मागता येईल. यात सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबईकरांवर-लेप्टोच/
अमित शाह म्हणाले, ड्रग्जचा व्यापार नार्को टेररशी जोडला गेला आहे. गेल्या दहा वर्षांत २२ हजार कोटी रुपये किमतीचे ५,४३,००० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. ड्रग्जची तस्करी आता एक बहुस्तरीय गुन्हा झाला असून त्याविरोधात आपण सर्वांना उभे राहायचे आहे. सर्व यंत्रणा, पोलिसांचे उद्दिष्ट ड्रग्जचा वापर करणाऱ्यांना पकडणे तर आहेच, पण याच्या व्यापारातील लोकांना पकडण्यासह संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे असले पाहिजे.
…