अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

0
25
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ  (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal ) च्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले (Meghraj Rajebhosale) यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
थेट निवडणुकीसाठी असलेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे सभासदांनी समर्थ पॅनेलच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक येथे मतदान पार पडले. निवडणुकीत सुमारे ५० टक्के मतदान झाले असून मुंबईत सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याची नोंद झाली.

महामंडळाच्या एकूण १७ जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. अभिनेत्री विभागातून  ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), संकलक विभागातून विभागातून विजय खोचीकर (Vijay Khochikar) आणि संगीत विभागातून आनंद शिंदे (Anand Shinde) यांची बिनविरोध निवड झाली.

निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले (९५१ मते) आणि सुनील महाजन (७८६ मते) विजयी झाले. दिग्दर्शक विभागातून दीपक कदम (८४६ मते) आणि अजित शिरोळे (७५६ मते) यांनी विजय मिळवला. लेखक विभागातून राज काजी (८५० मते), अभिनेता विभागातून सुशांत शेलार (८९१ मते), छायाचित्रण विभागातून धनाजी यमकर (९५२ मते), नृत्य दिग्दर्शन विभागातून सुभाष नकाशे (८९२ मते), ध्वनिमुद्रण विभागातून शरद चव्हाण (९७५ मते), कला दिग्दर्शन विभागातून प्रवीण पाटील (८८५ मते), रंगभूषा विभागातून चैत्राली डोंगरे (९९८मते), निर्मिती व्यवस्थापन विभागातून रवींद्र गावडे (९१० मते), वितरण व प्रसिद्धी विभागातून गणेश गारगोटे (९०७ मते) आणि कामगार विभागातून विकास तोरणे (८८६ मते) विजयी झाले.

या निकालामुळे पुढील पाच वर्षांसाठी महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडे राहणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध प्रश्न, विकासाची दिशा आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here