महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 80 वर्षाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाची ऱ्या लाटेची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे ताळेबंदीचे अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहे. काहीजण मास्कही वापरात नाही आहेत. नियम न पाळल्यामुळे कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही करोनाचं संकट कायम असल्याने घाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदार घ्या असा आदेशही दिला होता. दरम्यान राज्यात पुन्हा निर्बंध लावले जाणार का यावर राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करत योग्य वर्तन ठेवण्याची गरज आहे. आपण नियम पाळले तर कोणतीही अडचण येणार नाही. तसेच तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून आरोग्य विभाग तयारी करत आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे आणि उपाय योजना केल्या जात आहेत.’असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.