⭐ गुरुपौर्णिमेनिमित्त शेअर केली खास पोस्ट
मुंबई :-राज्यात सध्या सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीसह महायुतीनेही कंबर कसली आहे. भाजपकडून कार्यकारणीचं अधिवेशन आणि बैठकांचा धडाका सुरु आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रोड मॅप तयार केला जात आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. एकीकडे भाजप पदाधिकारी आणि नेते मंडळीना पुढील रणनिती समजावताना दिसत आहेत, असं असलं तरी दुसरीकडे शिवसेना सोडून आलेल्या भाजप नेत्याची निष्ठा बाळासाहेब ठाकरेंवर असल्याचं दिसत आहे.भाजपमध्ये असूनही खासदार नारायण राणेंची श्रद्धा अजूनही बाळासाहेब ठाकरेंवरच आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कृषी-पर्यटनासाठी-एनएच/
भाजपमध्ये असूनही नारायण राणे यांची श्रद्धा अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच आहे. याचा पुरावा त्यांनी स्वत:च दिला आहे. नारायण राणे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त खास पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरेंवरील श्रद्धेचं उदाहरण दिलं आहे. याआधीही नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त गुरु, पितृतुल्य, बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली देणारी पोस्ट लिहिली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणे गुरु बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
⭐ नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंची आठवण
गुरुपौर्णिमेनिमित्त भाजपचे खासदार नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नारायण राणे यांनी एक्स मीडिया म्हणजेच आधीच्या ट्विटरवर खास पोस्ट केली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स मिडिया अकाऊंटवरुन बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ट्वीट केला आहे. शिवसेना प्रमुखांचा फोटो ट्वीट करताना “गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अस लिहिल आहे.
⭐ गुरुपौर्णिमेनिमित्त शेअर केली खास पोस्ट
गुरुपौर्णिमेला हिंदू धर्मात फार महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत. यानिमित्ताने राजकारण्यांनीही त्यांच्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भाजपचे खासदार नारायण राणे यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
नारायण राणे यांनी शिवसेना पक्षातून राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात केली. नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाचे धडे घेतले, ते त्यांचे गुरु. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या नारायण राणेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडली.