सिंधुदुर्ग – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- हजरत निजामुद्दीन – मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरून अपघात कोकण रेल्वे मार्गावर झाला आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये आज पहाटे 4.15 वाजता दरड कोसळल्याने हा अपघात झाला . देखभाल दुरुस्ती आणि वैद्यकीय उपचार गाडी रत्नागिरीहून घटनास्थळी दाखल झाली आहे . रेल्वे अधिकारी दुरुस्ती पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत . या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही .मात्र अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती .मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या होत्या.
शनिवारी सकाळी ही गाडी रत्नागिरीजवळील करबुडे बोगद्यात घुसली तेव्हा ती रुळावरून उतरली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम अजूनही सुरू आहे.