Kokan: विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत वाकवली हायस्कूलचे यश

0
29
विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत वाकवली हायस्कूलचे यश
अखिल भारतीय विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यातंर्गत दापोली येथील ए. जी. हायस्कूल येथे आयोजित केलेल्या विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत वाकवली हायस्कूलची विद्यार्थीनी कु. श्रावणी विजय डिसले हिने दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दापोली- अखिल भारतीय विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यातंर्गत दापोली येथील ए. जी. हायस्कूल येथे आयोजित केलेल्या विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत वाकवली हायस्कूलची विद्यार्थीनी कु. श्रावणी विजय डिसले हिने दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्राथमिक-शिक्षक-पतपेढीत/

अखिल भारतीय विज्ञान मंडळाच्या वतीने दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या विज्ञान मेळाव्यानिमित्त यावर्षी देखील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. दापोली तालुक्यातील अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही वक्तृत्व स्पर्धा म्हणजे केवळ भाषण नसून सहभागी विद्यार्थ्यांना वक्तृत्वाबरोबरच स्वतः निवडलेल्या विषयाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सादरीकरणही करावे लागते. याशिवाय परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरेही द्यावी लागतात.

दापोली येथील ए.जी. हायस्कूल येथे पार पडलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील वाकवली हायस्कूलची विद्यार्थीनी कु. श्रावणी विजय डिसले हिने इतर स्पर्धकांवर मात करीत पहिला क्रमांक पटकावला आहे. वाकवली हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण सिदनाईक यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, स्कूल कमिटी व सर्व पालकांनी श्रावणीचे कौतुक व अभिनंदन करून पुढील जिल्हास्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here