Kokan: आजगाव भोमवाडी ग्रामसेविका श्रीमती भक्ती भगवान शेटकर-परब त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी तेथील राकेश गोवेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0
19
राकेश गोवेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
आजगाव भोमवाडी ग्रामसेविका श्रीमती भक्ती भगवान शेटकर-परब त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी तेथील राकेश गोवेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


सावंतवाडी- तालुक्यातील आजगांव भोमवाडी येथील राकेश तुकाराम गोवेकर यांना आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतीने घराची आकारणी करून देखील अद्याप पर्यंत घर नंबर न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडून न्याय मागण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज राजेश गोवेकर यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सह्याद्रि-शिक्षण-संस्थे/

राकेश गोवेकर यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की २४ फेब्रुवारी २००० पासून वेळोवेळी ग्रामपंचायत आजगाव भोमवाडीकडे केलेला पत्रव्यवहार संमतीपत्रके (प्रतिज्ञापत्रे) इत्यादी ग्रामपंचायत भोमवाडी, ता. सावंतवाडी हद्दीतील ग्रामसेवक, श्रीमती भक्ती भगवान बेटकर परब यांचेवर वरिष्ठांचे लेखी आदेशाने अवमान करून जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करणेबाबत माझे उपोषण ग्रामसेवक यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्या प्रमाणे त्यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम १९५८ अन्वये कलम ३९ प्रमाणे आपले स्तरावरून चौकशीचे  त्वरित आदेश होऊन कारवाई करण्यात यावी तसेच दि. २५००१/२०२४ ग्रामपंचायतीचे मला पत्र, आपल्या मागणी बाबत ग्रामपंचायत प्रशासन सकारात्मक असून वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

त्यामुळे माननीय गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने उपोषणासारखा मार्ग न अवलंबता ग्रामपंचायत प्रसासानास सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे हि विनंती केली, म्हणून २६, जानेवारीचे उपोषण स्थगित केले, तरी मला न्याय मिळाला नाही. त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करणार आहे तरी दि. १५/०८/२०२४ रोजी माझ्या उपोषणाची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक श्रीमती भक्ती भगवान शेटकर-परब पांचेवर राहील असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here