समृद्धी महामार्ग होणार अधिक हिरवागार; हरितीकरणासाठी सामाजिक वनीकरण विभाग आणि एमएसआरडीसीमध्ये करार
मुंबई : राज्यातील महत्त्वाकांक्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अधिक हरित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी व्यापक वृक्षारोपण आणि हरितीकरण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.



