शाळा प्रवेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; पहिल्याच दिवशी ३०९ शाळांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या भेटी

0
13
अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी
अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी

शाळा प्रवेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; पहिल्याच दिवशी ३०९ शाळांना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या भेटी

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला असून १५ जून रोजी शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ३०९ शाळांना लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी भेट देणार आहेत. “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्हा परिषद शाळांबाबत पालक व समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, पटसंख्या वाढविणे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.
यावेळी शाळांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, पोषण आहार, क्रीडा व कला सुविधा, शौचालयांची स्थिती तसेच इतर मूलभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधित विभागांना दिल्या जाणार आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच व पालकांशी संवाद साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शासकीय शाळांकडे कल वाढविण्यासाठी उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here