Kokan: पत्रादेवी रोड आरोसबाग तिठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोरट्या दारूच्या वहातूकीवर कारवाई

0
16
चोरट्या दारूच्या वहातूकीवर कारवाई ,
पत्रादेवी रोड आरोसबाग तिठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोरट्या दारूच्या वहातूकीवर कारवाई

६ लाख १६ हजार ९६० रूपयाच्या मुद्देमालासह संग्राम विक्रम सिंघ या संशयीतास कारवाई करून घेतले ताब्यात.

सुनिता भाईप/ सावंतवाडी- गोव्याहुन मुबंईला गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची वहातुक होणार असल्याची पक्कि खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याने अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रादेवी रोड आरोसबाग तिठ्यावर सापळा रचून वहानाची तपासणी सुरू केली. एम.एच.-47-एन.-1424 ही पांढर्या रंगाची हुंडाई कंपनीची कार आली असता कारची झडती घेतल्यावर कारच्या मागच्या सीटवर गोवा बनावटीची वेगवेगळ्या कंपनीची चोरटी दारू सापडुन आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवणमध्ये-मोठी-दुर्घटन/

सदर चोरट्या वहातुकीवर कारवाई करून 2 लाख 16 हजार 960 रूपयांचे मद्य 4 लाख रूपये किमंतीची कार मीळुन 6 लाख 16 हजार 960 रूपयाच्या मुद्देमालासह संग्राम विक्रम सिंघ वय 31 राहाणार मालाड मुंबई या संशयीतावर कारवाई करून ताब्यात घेतले.सदरची कारवाई प्रभारी निरिक्षक प्रदिप रास्कर,सहा. दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे,जवान रणजीत शिंदे,चालक दिपक वायदंडे यांनी केली. अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here