Maharashtra: शाळांमध्ये आता होणार पोलिस पडताळणी

1
32
पोलीस,दैवगडात तरूणीची छेड काढणारे वसईतील पोलीस निलंबित ,
दैवगडात तरूणीची छेड काढणारे वसईतील पोलीस निलंबित

बदलापूर- बदलापूरच्या घटनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासन निर्णय जारी केला असून, शाळेतील शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सर्वांची पोलिस पडताळणी केली जाणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अखेर-ग्रामसेवकांनी-बांध/

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, लाडकी बहीण योजनेचा धूमधडाका उडवणा-या सरकारच्या अब्रूची लक्तरे निघाली आहेत. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने आज पुन्हा शासनादेश जारी करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलिस यंत्रणेकडून मागणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे निर्देश शिक्षणाधिका-यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यात येणार असून, समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असतील. शाळांमध्ये तक्रार पेटींचादेखील प्रभावीपणे वापर व्हावा, सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन करावे, शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षणाधिका-यांना सांगावा अन्यथा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here