कृषी विज्ञान केंद्र, किल्ला (रोहा) येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट; शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचे वाटप रोहा –

0
23
कृषी विज्ञान केंद्र, किल्ला (रोहा) येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट; शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचे वाटप
कृषी विज्ञान केंद्र, किल्ला (रोहा) येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट; शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचे वाटप

कृषी विज्ञान केंद्र, किल्ला (रोहा) येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट; शेतकऱ्यांना सुधारित बियाणांचे वाटप

रोहा –
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी कृषि विज्ञान केंद्र, किल्ला, तालुका रोहा येथे भेट देऊन शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान डॉ. भावे यांच्या हस्ते रोहा तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना भाताच्या रत्नागिरी-८ तसेच भुईमुगाच्या कोकण भुरत्न या सुधारित वाणांच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण पीक घेण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. भावे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित बियाण्यांचा वापर, उत्पादनवाढ आणि कृषी संशोधनाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यावर भर दिला. कृषी विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचा लाभ पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास विद्यापीठ अभियंता राहुल घाडगे, रोहा प्रक्षेत्रावरील काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पतंगे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मनोज तलाठी, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. साळवी, रेपोली संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. निगडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here