देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने जुन्या वाहनांना स्क्रॅपिंग धोरण लागू केले. या धोरणाअंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी घोषणा केली आहे. जुनी वाहने स्क्रॅप करून नवीन वाहनांना सवलत देण्याचे मान्य केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-महाराष्ट्र-राज्य-व्यापा/
जुनी प्रदूषित वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकणे हा वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2022 पासून हे धोरण लागू करण्यात आले होते. मार्च 2025 पर्यंत 90 हजार जुनी वाहने भंगारात बदलण्याचे सरकारचे उद्दीष्ट्य आहे. जुनी वाहने स्क्रॅप केल्यानंतर नवीन वाहनांवर सूट देण्यात येणार आहे. ऐन सणासुदीत केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेमुळे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
प्रवासी वाहन उत्पादक स्क्रॅप केलेल्या वाहनांच्या बदल्यात नवीन कार खरेदीवर 20 हजार रुपयांपर्यंत सवलत देतील. मर्सिडीज-बेंझ इंडियाने विद्यमान ऑफर व्यतिरिक्त 25 हजार रुपयांची सवलत जाहीर केली आहे. आगामी काळात वाहन उत्पादक कंपन्या अतिरिक्त सवलतही जाहीर करू शकतात.
व्यावसायिक वाहन उत्पादकांनी 3.5 टनांपेक्षा जास्त वजनाच्या भंगार व्यावसायिक मालवाहू वाहनांसाठी एक्स शोरूम 3 टक्के सवलत देणार आहे. तर 3.5 टनांपेक्षा कमी वजनाच्या वाहनांवर 1.5 टक्के सवलत देण्यात येईल. जड आणि हलकी व्यावसायिक वाहने स्क्रॅप करण्यासाठी ट्रेडेड डिपॉझिट प्रमाणपत्र वापरणाऱ्या खरेदीदारांना 2.75 आणि 1.25 टक्के सूट मिळेल