"जनसेवा हीच ईश्वरसेवा हेच आमचं ब्रीद" – विशाल परब; बांदा येथे फळ-भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप
“जनसेवा हीच ईश्वरसेवा हेच आमचं ब्रीद” – विशाल परब; बांदा येथे फळ-भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप
बांदा –
“समाजातील वंचित व गरजू लोकांच्या समस्या दूर करणे हेच भाजप पक्षाचे धोरण आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अनुसरून आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहोत,” असे प्रतिपादन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले. बांदा येथे फळ व भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी फळ व भाजी विक्रेत्यांना मोफत छत्री वाटप उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज बांदा येथील विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
रवींद्र चव्हाण, नितेश राणे यांचे कौतुक
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, “भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून विकासात्मक कामांचा झपाटा लावणारे पालकमंत्री नितेश राणे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या धोरणात्मक निर्णयांचा फायदा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला होत आहे. यापूर्वी पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनीही अतिशय चांगले काम केले आहे.”
सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय
विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले आहेत. समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी ते कायम तत्पर असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने योगदान देत त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना आधार, युवकांना प्रोत्साहन तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून समाजातील गरजू घटकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा आहे. प्रसिद्धीपेक्षा जनतेच्या सेवेला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून विशाल परब यांची ओळख निर्माण झाली आहे. सत्ता किंवा पदाची अपेक्षा न ठेवता समाजहिताचा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या या युवा नेतृत्वाला विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मानाचा मुजरा अर्पण केला आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर सावंतवाडी उपनगराध्यक्ष अॅड. अनिलजी निरवडेकर, शहराध्यक्ष निलेश नाटेकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, देवळ येवडे, दादू कविटांकर, माजी सरपंच बाळा आकेलकर, माजी सभापती शितल राऊळ, युवा कार्यकर्ते निलेश उर्फ पापू कदम, सिद्धेश महाजन, बालम आंगो, बाळा पेडणेकर, स्मिता पेडणेकर, बाबा काणेकर, मनोज कल्याणकर, साहिल कल्याणकर आदी उपस्थित होते.