रांजणगावातील जेबिलच्या अत्याधुनिक विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन

0
22
रांजणगावातील जेबिलच्या अत्याधुनिक विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन
रांजणगावातील जेबिलच्या अत्याधुनिक विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन

रांजणगावातील जेबिलच्या अत्याधुनिक विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन

महाराष्ट्राला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स व डेटा सेंटर हब बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रांजणगाव, पुणे : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जेबिल (Jabil) कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाचे उद्घाटन आणि कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे, माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक उत्पादन, तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रगण्य राज्य बनविण्याचा शासनाचा निर्धार व्यक्त केला. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील, असे त्यांनी सांगितले.
तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा राज्य शासन राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रमुख डेटा सेंटर हब बनत असून भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. त्यामुळे डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था राज्यात उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमास आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, जेबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी संचालन अधिकारी अँडी प्रिस्टली, जेबिल सर्किट इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here