पुणे मनपेकडून विधवा महिला व दिव्यांगांसाठी आर्थिक मदत योजना
अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
पुणे | प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विधवा महिला आणि दिव्यांग बांधवांना आर्थिक आधार देण्यासाठी विशेष सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना ₹४९ हजारांची (49000) एकरकमी आर्थिक मदत तर दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार वार्षिक आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
योजनेचे फायदे :
विधवा महिलांसाठी :
₹४९,००० एकरकमी आर्थिक सहाय्य
वय १८ ते ६५ वर्षे
मृत व्यक्तीचे २ वर्षांपूर्वी आलेले मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक.
दिव्यांग व्यक्तींसाठी वार्षिक सहाय्य :
४०% ते ५०% दिव्यांगत्व → ₹३०,०००
५१% ते ६०% दिव्यांगत्व → ₹३६,०००
६१% ते ९०% दिव्यांगत्व → ₹४२,०००
९०% ते १००% (थेलेसेमिया/कुष्ठरोग) → ₹४८,०००
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२६
अर्ज कुठे करायचा ?
महापौर कार्यालय, पुणे मनपा
संपर्क : ०२०-२५५०१०१० / ९५५२५८२५८९
आजच अर्ज करा आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार द्या.
योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ असून, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे. अर्ज महापौर कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे स्वीकारले जात आहेत.