शेती पंपांची वीज तोडण्याच्या निर्णय सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करू – शशिकांत शिंदे
शेती पंपांची वीज तोडण्याच्या निर्णय सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करू – शशिकांत शिंदे
शेती पंपांची वीज तोडण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा संताप
सातारा जिल्ह्यातील प्रमुख नद्या, ओढे, नाले, बंधारे आणि धरण परिसरातील शेती पंपांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च, अपुरी कर्जमाफी आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेती पंपांची वीज तोडण्याच्या निर्णय सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करू – शशिकांत शिंदे
या निर्णयाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शेती पंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्यास ऊस, भाजीपाला, फळबागा, हिरवा चारा, दुग्धव्यवसाय तसेच शेतीपूरक उद्योगांवर गंभीर परिणाम होणार असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.
शशिकांत शिंदे यांनी स्मार्ट मीटरची सक्ती, कर्जमाफीतील जाचक अटी आणि शेती पंपांची वीज बंदी ही शेतकरीविरोधी धोरणे असल्याचा आरोप करत सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही दिला.