⭐नियमबाह्य कामामुळे रस्ता साईड पट्टीची मात्र वाट –
दोडामार्ग /प्रतिनिधी: दोडामार्ग ते बांदा मार्गावर एका बाजूने जीवन प्राधिकरण यांची जलवाहिनी, तर दुसर्या बाजूला महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची पाईप लाईन यामुळे गेल्या काही वर्षांत नियमबाह्य कामामुळे रस्ता साईड पट्टी यांची वाट लावली. नागरीकांना वाहन धारकांना मोठा ञास सहन करावा लागला. अनेक अपघात घडले. आजही दोडामार्ग ते बांदा मार्गावर गॅस पाईप लाईन काम पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून काम सुरू आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-30-सप्टेंबर-पर्यंत-अक्षय-श/
नियमबाह्य कामाला बांधकाम अधिकारी पाठीशी घालत आहेत, मणेरी पुलाच्या वरच्या बाजूला पाण्यात अंडरग्राउंड खोदाई करून टाकलेली पाईप लाईन फेल गेल्याने आता ही लाईन काढून दुसरा ठेकेदार नेमून गॅस कंपनी पुलाच्या खालच्या बाजूला अंडरग्राउंड खोदाई करून लाईन टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे मणेरी पुल धोक्यात आला आहे. असे असताना बांधकाम विभाग अधिकारी बघ्यांची भूमिका घेत आहेत यामुळे संताप व्यक्त होत आहे.