रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन

0
24
रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन
रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन

रोजगार व उद्योग क्षेत्राच्या व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन

रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

अलिबाग : देशातील रोजगार स्थिती तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या आर्थिक परिस्थितीबाबत अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचे प्रकाशन रायगड जिल्हाधिकारी Kishan Jawale यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाच्या वतीने नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey – PLFS) 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises – ASUSE) 2026 हे सर्वेक्षण एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. रोजगार, बेरोजगारी, श्रमिकांची स्थिती तसेच असंघटित उद्योग क्षेत्रातील आर्थिक घडामोडींची अचूक माहिती उपलब्ध करून देणे हा या सर्वेक्षणांचा प्रमुख उद्देश आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही सर्वेक्षणांची अंमलबजावणी एकत्रित स्वरूपात प्रथमच करण्यात येणार असून त्याद्वारे देशातील रोजगार व उद्योग क्षेत्राचे अधिक व्यापक आणि वास्तव चित्र समोर येण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाच्या माहितीपर घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी Shrirang Suryavanshi, सांख्यिकी अधिकारी Dnyaneshwar Nagarale, सांख्यिकी सहाय्यक Dipti Pande तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, उद्योग प्रोत्साहन आणि धोरणात्मक नियोजनासाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार असून शासनाच्या विविध विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही या आकडेवारीचा उपयोग होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here