ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवरील शहरांची नावे अद्ययावत करणे व नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत पनवेलमध्ये विशेष बैठक

0
22
ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवरील शहरांची नावे अद्ययावत करणे व नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत पनवेलमध्ये विशेष बैठक
ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवरील शहरांची नावे अद्ययावत करणे व नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत पनवेलमध्ये विशेष बैठक

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवरील शहरांची नावे अद्ययावत करणे व नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत पनवेलमध्ये विशेष बैठक

पनवेल : ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदी या दोन्ही विषयांवर सविस्तर चर्चा करणे, सूचना देणे आणि केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल मार्फत मंगळवार, दि.२३ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. कॉन्फरन्स हॉल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल व्हॅली शिल्प को.ऑप. हौ.सो. बिल्डींग नं. एच-1, दुसरा मजला, सेक्टर ३६, खारघर नोड, ता.पनवेल येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला पनवेल, उरण, खालापूर व कर्जत या तालुक्यातील सर्व वाहतूकदार, कुरियर प्रतिनिधी आणि बुकींग एजन्सी धारकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहा.प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल सुरज पवार यांनी केले आहे.
या बैठकीत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा, सूचना आणि आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे. पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील सर्व वाहतूकदार, कुरिअर प्रतिनिधी तसेच बुकिंग एजन्सी धारकांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरज पवार (Suraj Pawar) यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबादचे “छत्रपती संभाजी नगर” (Chhatrapati Sambhajinagar), उस्मानाबादचे “धाराशिव” (Dharashiv) आणि अहमदनगरचे “अहिल्यानगर” (Ahilyanagar) असे नामांतर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व प्रवासी वाहतूकदार आणि बुकिंग एजन्सींनी आपल्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये ही नवीन नावे तातडीने अद्ययावत करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन सिंथेटिक मांजाच्या वाहतुकीवर संपूर्ण बंदी लागू आहे. मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठातील जनहित याचिकेतील आदेशानुसार स्थानिक वाहतूकदार आणि कुरिअर एजन्सींनी प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदी – मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल सु-मोटो जनहित याचिका क्र. 08/2020 मधील आदेशानुसार, नायलॉन सिंथेटिक मांजाच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक वाहतूकदार व कुरियर एजन्सीज यांनी नायलॉन मांजाची वाहतूक (Transport) करू नये याबाबत आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या विषयांबाबत संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने कार्यवाही करावी आणि शासन व न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असेही परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here