डोंबिवलीत विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात शालेय साहित्य विक्री केंद्र सुरू

0
21
डोंबिवलीत विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात शालेय साहित्य विक्री केंद्र सुरू
डोंबिवलीत विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात शालेय साहित्य विक्री केंद्र सुरू

डोंबिवलीत विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात शालेय साहित्य विक्री केंद्र सुरू
भालचंद्र हनुमान पाटील यांचा उपक्रम; पालक व विद्यार्थ्यांना दिलासा

डोंबिवली : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे भालचंद्र हनुमान पाटील (Bhalchandra Hanuman Patil )यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्व येथे शालेय साहित्य विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर, कैलास लस्सी सेंटरच्या शेजारी सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक गरजांशी संबंधित विविध साहित्य अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये १०० व २०० पानांच्या सिंगल लाईन व डबल लाईन वह्या, आकर्षक डिझाइनच्या A4 आणि लाँग वह्या, पुस्तकांसाठी ब्राऊन कव्हर, पाण्याच्या बाटल्या तसेच इतर शालेय साहित्याचा समावेश आहे.
शालेय साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक पालकांवर आर्थिक ताण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य वाजवी दरात उपलब्ध व्हावे आणि पालकांचा खर्च कमी व्हावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भालचंद्र हनुमान पाटील यांनी केले आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून शैक्षणिक क्षेत्रातील हा उपक्रम अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here